

Motala’s Ancient Structure Showcases Fine Sculpture Art, But Time Takes Its Toll
Sakal
-शाहीद कुरेशी
मोताळा (जि. बुलडाणा): निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मोताळा तालुक्यात अनेक पुरातन वास्तू वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. मात्र, पुरातत्त्व विभागासह संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था होत आहे. हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून, नागरिकांकडून तशी अपेक्षा व्यक्त होत आहे.