Nagpur Crime : शासकीय जमीनीवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह कुटुंबियांवर गुन्हा

फुटाळ्यालगत असलेल्या पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची जागा बळकावित, त्यावर अनधिकृत बांधकाम केले.
Corporator Kamlesh Chaudhary
Corporator Kamlesh Chaudharysakal
Updated on

नागपूर - फुटाळ्यालगत असलेल्या पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची जागा बळकावित, त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी माजी नगरसेवक कमलेश चौधरी याच्यासह आई आणि काकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रमोदकुमार विश्‍वासराव तायडे (वय ५३, रा. वेलकम सोसायटी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटाळा तलावालगत असलेल्या पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाला मौजा तेलंखेडीची खसरा क्रमांक २० ही जागा शासनाने १६ एप्रिल २००५ ला हस्तांतरीत केली होती.

दरम्यान त्यावर कमलेश दिलीप चौधरी, मीना दिलीप चौधरी, मुकेश दिलीप चौधरी यांनी अतिक्रमण करीत, निवासी इमारत आणि लग्न कार्यासाठी लॉन सुरू केला होता. फुटाळा हे हेरिटेज प्रकारात मोडत असून त्यावर अतिक्रमण करून अवैधरित्या बांधकाम करून त्याचा व्यावसायिकदृष्ट्या वापर केला.

त्यासाठी महापालिकेचीही परवानगी त्यांनी घेतली नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान त्यामुळे विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन कार्यास अडथळा निर्माण केल्याची तक्रार प्रमोद तायडे यांनी केली होती. त्यातून पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायदी आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कायदेशिर कारवाई करीत, गुन्हा दाखल केला. पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com