
डॉ. प्रकाश कोतवाल
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना तपासण्याची आणि शस्त्रक्रिया करण्याची मला २००४ मध्ये संधी मिळाली. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी नुकतीच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. मनगटाला होणाऱ्या त्रासामुळे डॉ. सिंग यांना लिहिणे, स्वाक्षरी करणे किंवा शर्टाची बटणे लावण्यासारखी लहानसहान कामे करणे अवघड झाले होते. त्यांच्या मनगटाची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचा निष्कर्ष निघाला आणि त्यानुसार शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले.