

नागपूर : वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदवायला गेलेल्या मुलाला वडिलांचा थेट मृतदेहच बघायला मिळाला. ही घटना बेलतरोडी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अरुण गोपीचंद घरडे (५३) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा रोडवरील आऊटर रिंग रोडजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती बेलतरोडी पोलिस ठाण्यातील निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांना मिळाली. मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली आणि पंचनामा तयार केला. मृत व्यक्तीच्या अंगावर थोडेफार खरचटल्याच्या जखमा होत्या. या दरम्यान सचिन घरडे (रा. दत्तनगर, बेसा) हे बेलतरोडी पोलिस ठाण्यात पोहोचले.
कालपासून वडील बेपत्ता असून त्यांचा शोध घेत असून ते सापडत नाहीत, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. त्यांनी वडिलाचे वर्णन सांगितल्यानंतर त्याच वर्णनाच्या व्यक्तीचा मृतदेह आउटर रिंगरोडवर पडलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यांनी पीआय नाईकवाड यांना फोन केला आणि सचिन घरडे यांनी घटनास्थळावर पाठवले.
सचिनने मृतदेह बघताच हंबरडा फोडला. त्याने वडिलाचा मृतदेह असल्याची ओळख पटविली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अरुण यांना दारूचे व्यसन होते. ते सोमवारी ‘थोड्या वेळात घरी येतो’ असे सांगून बाहेर पडले होते. ते बोलेरो वाहन चालक होते. त्यांचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.