

नागपूर : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानातून समाजात झालेली जागरूकता तसेच पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागपूर जिल्हा मुलींच्या स्वागतात आघाडीवर आहे. राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुण्यालाही उपराजधानी नागपूरने मागे टाकले. परंतु, राज्याचे एक हजार मुलांमागे ९९४ मुलींचे लक्ष्य अद्याप लांबच असल्याचे दिसून येते.
२०१८ ते २० या तीन वर्षांत एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी अधिक होताना आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून येते. या आकडेवारीनुसार मुलींचे स्वागत करण्यात नागपूर जिल्हा आघाडीवर दिसून येतो. नागपुरात २०१८ ते २० या तीन वर्षांत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९३.८ टक्के आहे.
२०१८ मध्ये नागपुरात मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.४ होती. २०१९ मध्ये ही टक्केवारी ९४.२ पर्यंत गेली. मात्र, २०२० मध्ये मुलींच्या जन्माच्या टक्केवारीचा आलेख ९३.९ पर्यंत खाली आला. परंतु, या तिन्ही वर्षाची एकूण सरासरी टक्केवारी ९३.८ असून मुंबई, पुण्याच्या तुलनेत समाधानकारक आहे. मुंबई जिल्ह्याची तीन वर्षांची एकूण सरासरी टक्केवारी ९३.५ आहे तर पुण्याची टक्केवारी ९१.४ टक्के आहे. राज्यातील या प्रमुख शहराच्या तुलनेत नागपूर आघाडीवर आहे.
नागपुरात महापालिकेकडून काही वर्षांत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. याशिवाय पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत महापालिकेने गर्भलिंग निदानवर नियंत्रण आणले. तीन वर्षांत राज्यात एक हजार मुलांमागे मुलींची टक्केवारीचे प्रमाण ९१.६ आहे. २०१८ मध्ये राज्यात एक हजार मुलांमागे मुलींची टक्केवारी ९१.६ होती. २०१९ मध्ये यात सुधारणा झाली. या वर्षात ही टक्केवारी ९१.९ पर्यंत पोहोचली. मागील वर्षी पुन्हा यात घट झाली. २०२० मध्ये मुलींची टक्केवारी ९१.३ होती.
जिल्हानिहाय मुली-मुलींची संख्या
वर्ष शहर मुलांची संख्या मुलींची संख्या मुलींचे प्रमाण (लिंग गुणोत्तर)
२०१८ नागपूर ३८,१३७ ३५,६१४ ९३.४
मुंबई ७७,९७७ ७३,२१० ९३.९
पुणे ७४,९२७ ६८,४८७ ९१.४
२०१९ नागपूर ३५,९०१ ३३,८११ ९४.२
मुंबई ७७,००५ ७१,८९३ ९३.४
पुणे ७०,२५४ ६३,५६२ ९०.५
२०२० नागपूर ३२,४५० ३०,४८३ ९३.९
मुंबई ६२,१७४ ५८,०१४ ९३.३
पुणे ७०,७५६ ६५,३८८ ९२.४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.