मित्रच निघाला मास्टरमाईंड, शिक्षकाला लुटणाऱ्या चौघांना अटक

crime news
crime newse sakal

नागपूर : मित्रासोबत अंधारात वेळ घालवताना तिघांनी एका शिक्षकाकडून सव्वातीन लाखांचा ऐवज लुटून नेला. मात्र, पोलिसांना तपासात भलतेच निष्पन्न झाले. शिक्षकाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाराच या कटाचा मास्टरमाईंड निघाला. त्यामुळे पोलिसांनी शिक्षकाच्या मित्रासह चौघांना अटक केली. अक्षय रवी लवसारे (२५, अमरनगर), आदित्य गजानन होंडवे (२४), स्वप्निल सारंग बोरकर (२४) आणि हर्षल दिलीप ढाले (२३) तीनही रा. सोमवारी क्वार्टर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय हा कटाचा मास्टररमाईंड आहे.

crime news
व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्यानगर येथे राहणारे संजय जगदीशप्रसाद तिवारी (५०) यांना युवकांशी मैत्री करून त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची सवय आहे. २४ एप्रिल रोजी सायंकाळी आठच्या सुमारास संजय हे खास मित्र अक्षयला घेऊन जबलपूर-हैदराबाद महामार्गावरील एका शेतात गेले. तेथे अंधारात अक्षयसोबत वेळ घालवत होते. ठरलेल्या कटाप्रमाणे शेतातून तीनही आरोपी धावत आले. आरोपींनी अक्षयच्या दिशेने दगड भिरकावल्याने तो पळून गेला. आरोपींनी संजयला मारहाण करून त्याच्याजवळील ३ लाख २६ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. त्याच रात्री संजयने हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार केली.

मोबाईलमुळे फुटले बिंग -

संजयने दिलेल्या माहितीत लुटारूंनी अक्षयला दगड फेकून मारल्यानंतर तो पळून गेला. मग त्याचा मोबाईल लुटारूंकडे कसा? असा प्रश्न पोलिसांना पडला. हाच धागा धरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतले. पोलिसांनी अक्षयला 'बाजीराव' दाखवताच त्याने लुटमारीची योजना आखल्याची कबुली पोलिसांना दिली.

पैशाची अडचण -

अक्षय हा अनेक दिवसांपासून संजय यांचा मित्र होता. त्याला पैशाची अडचण होती. संजय यांच्या अंगावर नेहमीच सोन्याचे दागिने असतात. ही बाब अक्षयला माहित होती. त्याने या कटात अन्य तीन मित्रांना सहभागी करून लुटमारीची योजना आखली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com