Nagpur News : आंतरजातीय जोडप्यांसाठी अनुदानाचे आले चार कोटी; ५० हजारांचे मिळते अनुदान; सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम
Intercaste couples : "नागपूरमधील ८३४ आंतरजातीय जोडप्यांना चार कोटी रुपयांच्या अनुदानातून प्रत्येकी ५० हजार रुपये मिळणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत समाजकल्याण विभागाने थकीत असलेले अनुदान वितरित केले."
नागपूर : जिल्ह्यातील ८३४ आंतरजातीय जोडप्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेले अनुदान जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला मिळाले आहे. चार कोटींची अनुदानातून प्रती जोडपे ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे.