esakal | नागपूर मेट्रो जोमात! चारही मेट्रो स्टेशन पास; ‘सीएमआरएस'ची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

four metro stations have passed in survey of CMRS

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही महामेट्रोने विकासा कामाचा वेग कायम ठेवत रहाटे कॉलनी, अजनी चौक, बंसीनगर आणि एलएडी चौक मेट्रो स्थानकाची कामे पूर्ण केली.

नागपूर मेट्रो जोमात! चारही मेट्रो स्टेशन पास; ‘सीएमआरएस'ची पाहणी

sakal_logo
By
राजेश प्रायकार

नागपूर ः लॉकडाऊनच्या प्रतिकूल काळाचा संधी म्हणून उपयोग करीत महामेट्रोने चार मेट्रो स्थानकांचे काम पूर्ण केले. पंधरा दिवसांपूर्वी या चारही स्थानकांवरील प्रवाशांच्या सुविधांची ‘सीएमआरएस'ने पाहणी केली होती. आज ‘सीएमआरएस'ने या चारही मेट्रो स्टेशनला परिपूर्णता प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आता मेट्रो सेवा आता १६ स्थानकांवरून सुरू होईल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही महामेट्रोने विकासा कामाचा वेग कायम ठेवत रहाटे कॉलनी, अजनी चौक, बंसीनगर आणि एलएडी चौक मेट्रो स्थानकाची कामे पूर्ण केली.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

ही स्थानके प्रवाशांसाठी तसेच मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) येथून प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी प्रमाणपत्र महामेट्रोला बहाल केले. रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी वर्धा मार्गावरील अजनी चौक व रहाटे कॉलनी तसेच हिंगणा मार्गावरील येथील एलएडी चौक व बंसीनगर स्थानकांची पाहणी केली होती.

त्यांनी विविध सुविधांचे निरीक्षण करत परिसरात असलेल्या सोयी-सुविधा तसेच सुरक्षेसंबंधी आढावा घेतला होता. या चारही स्थानकांना परिपूर्णता प्रमाणपत्र मिळाल्याने आता १२ ऐवजी १६ मेट्रो स्टेशनवरून मेट्रो सेवा सुरू होईल.

लॉकडाऊनमध्ये मेट्रोच्या कंत्राटदार कंपन्यांचे मजूर आपापल्या गावी परतले होते. त्यांना परत आणणेही कठीण झाले होते. त्यामुळे महामेट्रोने पोलिस, महापालिका, जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन मजुरांना बंगाल, राजस्थान, झारखंड राज्यातून परत आणण्यासाठी बसची व्यवस्था केली. ५० आसन क्षमतेच्या बसमध्ये २५-२५ मजूर शहरात आणून मेट्रोचे काम पूर्ण करण्या आले. मेट्रोच्या चारही स्थानकांचे काम वेळेत पूर्ण झाल्याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी या मजुरांचेही आभार मानले आहेत.

सविस्तर वाचा - रविवारपासून पाऊस झोडपणार, नुकसान टाळण्यासाठी करा पिकांचे नियोजन

हिरवळ ठरणार आकर्षण

रहाटे कॉलनी स्टेशनभोवती असलेली हिरवळ प्रवाशांना आकर्षित करणारी ठरणार आहे. अजनी चौकातील स्टेशनवर महामेट्रोने स्काय वॉकची व्यवस्था केली आहे. एलएडी कॉलनी चौकातील स्टेशन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. बंसीनगर स्टेशनमुळे हिंगणा औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image