उत्तर नागपूरमध्ये चार सौर ऊर्जा प्रकल्प; नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four solar power projects in North Nagpur Inauguration by Nitin Raut Generation of electricity

उत्तर नागपूरमध्ये चार सौर ऊर्जा प्रकल्प; नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : जन सामन्यांना अपारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या वापरा करिता प्रोत्साहित करण्याचे दृष्टीने उत्तर नागपूर क्षेत्रात २३० विविध ठिकाणी पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात येत आहेत. बुधवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते विविध चार ठिकाणी सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपारिक विजेची मागणी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. या विजेची निर्मिती करताना हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे.

यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वाना सोसावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणुन अपारंपारिक ऊर्जा स्रोतातून वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन व विज देयकात बचत होण्याच्या कार्यात या प्रकल्पांमुळे हातभार लागेल व जनजागृती होईल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री राऊत यांनी व्यक्त केला. बडी मशीद, बंदे नवाज चौक येथे ५ कि.वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली. सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत २.४५ लक्ष इतकी असून या प्रकल्पातून ६००० युनिटची वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.

अबू बकर मदरसा, नवीन वस्ती, टेका येथे ४ कि. . क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली. सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत १.९५ लक्ष इतकी असून या प्रकल्पातून ४८०० युनिट वीज निर्मिती प्रति वर्ष होणे अपेक्षित आहे. नूर मशीद, अशोक नगर, नागपूर येथे ३ कि.वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली. सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.१.४६ लक्ष इतकी असून या प्रकल्पातून ३६०० युनिट वीज निर्मिती प्रति वर्ष होणे अपेक्षित आहे.

Web Title: Four Solar Power Projects In North Nagpur Inauguration By Nitin Raut Generation Of Electricity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top