
मांत्रिकाची जादू; पैसे डबल करण्याच्या नादात फसला फळविक्रेता
नागपूर : गरम पाण्यावर जादू करून डबल पैसे करून देण्याच्या आमिषाला फळविक्रेता बळी पडला. त्याने डबल पैसे करण्याच्या नादात चार लाख रुपये मांत्रिकाला दिले. त्याने डबल रक्कम करण्यासाठी गरम पाण्यात नोटा टाकण्याचा बनाव करीत चार लाख रुपये घेऊन रफूचक्कर झाला. खैरूल असे आरोपी मांत्रिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाधर मनोहर शाहू (३९, रा. शिवनगर, पारडी) हा फळविक्रेता असून, त्याचे पारडीत दुकान आहे. ८ दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात खैरूल शेख नावाचा व्यक्ती आला. त्याने फळव्यापाराबाबत चर्चा केली आणि जादूने एका नोटेच्या दोन नोटा करणाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगितले. त्यावर शाहू यांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे खैरूलने उद्या येऊन प्रात्यक्षिक दाखविण्याचा विश्वास दिला.
हेही वाचा: मंगळवारपासून दुकाने रात्री आठपर्यंत; शनिवार व रविवारसाठी हे नियम
दुसऱ्या दिवशी खैरूल तीन साथीदारांसह शाहू यांच्या घरी आला. त्याने एका नोटेच्या दोन नोटा कशा बनतात, हे दाखविण्यासाठी घरी येण्यास सांगितले. लिलाधरला एका बकेटमध्ये गरम पाणी आणण्यास सांगितले. आरोपींनी पाण्यात एक लिक्वीड टाकले. त्यानंतर चार नोटा पाण्यात टाकल्या आणि झाकून ठेवल्या. १० मिनिटांत बकेटवरील झाकण काढले असता बकेटीत ८ नोटा दिसून आल्या. त्यामुळे लिलाधर यांचा पूर्ण विश्वास बसला. आरोपींनी लिलाधर यांना जास्त रक्कम जमविण्यास सांगितले. ही बाब त्यांनी मित्र प्रफुल्ल डायरे यांना सांगितली.
घर ठेवले गहाण
लिलाधर यांना कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांनी घर गहाण ठेवून सावकाराकडून ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी ३ लाखांची रक्कम लिलाधर यांच्याकडे होती. त्या रकमेतून व्यापार वाढवायचा होता. अशा स्थितीच या मांत्रिकांच्या टोळीने त्यांना जाळ्यात अडकविले. तीन लाख जवळचे आणि १ लाख मित्र प्रफुलकडून उधार घेतलेले असे चार लाख जमवले आणि मांत्रिकांना घरी बोलावले.
हेही वाचा: अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक
नोटांऐवजी कागदाचे बंडल
३१ जुलैला चारही आरोपी लिलाधर यांच्या घरी आले. मोठ्या भांड्यात गरम पाणी आणण्यास सांगितले. मांत्रिकांनी चार लाखांची बंडल मांत्रिकांना दिले. त्यांना गरम पाण्यात लिक्वीड टाकले आणि त्यामधे नोटांची बंडल टाकण्याचा बनाव केला. ते पैसे जवळच्या बॅगेत कोंबले. भांड्यावर झाकण ठेवले आणि तीन तासांनी भांडे उघडण्यास सांगितले. त्यानंतर मांत्रिक निघून गेले. तीन तासांनंतर त्यांनी भांडे उघडले असता त्यात कागदाच्या बंडल आढळून आले. या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.