VIDEO : क्रांतिकारक नररत्न महादेव डेकाटे एक दुर्लक्षित महापुरुष; विदर्भाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व 

Freedom Fighter Mahadev Dekate an unsung hero of Vidarbha
Freedom Fighter Mahadev Dekate an unsung hero of Vidarbha

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड शहराने एक अनमोल रत्न गमावला तो म्हणजे नररत्न म. स. डेकाटे जे लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले त्यांच्या नेहमी संपर्कात असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते , एक संपादक ,पत्रकार , छायाचित्रकार , मुद्रक , प्रकाशक अश्या अनेक भूमिका पार पडणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. अनेकांना त्यांच्या बद्दल माहितीच नाही नररत्न डेकाटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी या लहानश्या गावी १८९२ साली असून ते मूळचे वर्धा जिल्ह्याचे होते अशी माहिती जुनी जाणकार मंडळी देतात . 

श्री महादेव डेकाटे अगदी तरुण वयात १९०८ पासून काँग्रेसचे सभासद झाले बहुतेक सर्व काँग्रेस अधिवेशनात ते उपस्थित होते भारतात अभिनव असा झेंडा सत्याग्रह १९२३ साली नागपूरलाच सुरू झाला त्यात एका तुकडीचे नेतृत्व महादेव डेकाटे यांनी केले व तुरुंगवास पत्करला त्यावेळी सतत ४-५ वर्षे ते नागपूर काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी होते आचार्य दादा धर्माधिकारी, पंडित सुंदरलाल डॉ. चोळकर बॅ. अभ्यंकर इत्यादी नागपुरातील तत्कालीन ज्येष्ठ पुढाऱ्याच्या डेकाटे यांचा समावेश होता

लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित डेकाटे सतत त्यांच्या संपर्कात असायचे , १८ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांनी लोकमान्य टिळकांची सभा उमरेड शहरात आयोजित केली होती ती  जागा आज टिळक चौक म्हणून प्रचलित आहे . देशाच्या शीर्षस्थ नेत्याला उमरेड सारख्या लहान गावात आणणेही महादेवरावांच्या संघटन कौशल्य ची पावती म्हणावी लागेल लोकमान्य टिळकांच्या उमरेडच्या सभेमुळे स्वातंत्र्याची चळवळ पवनी, ब्रह्मपुरी ,भिवापुर,कुही ,मांढळ ,गिरड,बेला इत्यादी क्षेत्रात जोमाने फोफावली.

 १९२६ च्या सुमारास काँग्रेसचे कार्य सर्वदूर पसरविण्यासाठी महादेव डेकाटे उमरेड ला स्थाईक झाले त्यांच्या कामाचा झंजावात वर्धा ,चांदा (चंद्रपूर) , भंडारा या जिल्ह्यात सर्वदूर पोहोचला त्याने प्रभावित झालेल्या अनेकांपैकी एक युवक होते मारुती सां कन्नमवार  नररत्न डेकाटे यामुळेच मी स्वातंत्र्यलढ्यात व राजकारणात आलो असा ऋणनिर्देश ते करीत,  ती जाण ठेवून महाराष्ट्राचे मंत्री झाल्यावर नामदार मा सा कन्नमवार यांनी नररत्न डेकाटे यांची स्मृती जिवंत ठेवण्याचा पहिला प्रयत्न म्हणून १९६१ साली नररत्न डेकाटे स्मारक समिती स्थापन केली सहकार चळवळ , झेंडा व मिठाचा सत्याग्रह इत्यादी कार्यक्रमाद्वारे पटेल, नेहरूंना सोबत घेऊन स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींनी सुरू ठेवला महादेवरावांच्या जीवन पटाकडे पाहिल्‍यास टिळक गांधी त्यांचे स्फूर्तीस्थान होते 

आपल्या कमी शिक्षणाची खंत न बाळगता तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर उमरेड नागपूर भागात जनजागृतीचे कार्य घेऊन विशेषतः हलबा समाजाचे प्रबोधन करण्याचा विडा त्यांनी उचलला त्यांनी इंग्रजीचे शिक्षण स्वतःच्या प्रयत्नाने पूर्ण केले प्रसारमाध्यमांचे अचूक महत्त्व त्यांनी ओळखले होते पुण्याला अक्षर शाळा उघडून सोबत छापखाना मुद्रण फोटोग्राफी विद्यार्थ्यांचे शिक्षण अल्पावधीत प्राप्त केले पत्रकार संपादक फोटोग्राफर म्हणून मासिक साप्ताहिक दैनिक इत्यादी माध्यमातून समाज संपर्क साधून हलबा बांधवांना जागृत करण्याचे कार्य त्यांनी अव्याहत केले लौकिक दृष्टीने कमी शिक्षित असलेल्या न रत्नांनी अशिक्षित समाजाला वर आणण्यासाठी कित्तेक सामाजिक शिक्षण परिषदांचे आयोजन केले ही बाब अलौकिक अशीच आहे.

आपल्या कर्तुत्वाने त्यांनी काँग्रेसमध्ये जबाबदारीची पदे भूषविली ही जबाबदारी पार पाडताना देखील समाजाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही इंग्रजी कापडाची होळी विदेशी कापड व दारूच्या दुकानासमोर पीकेटिंग इत्यादी कार्यक्रमाद्वारे त्यांनी जनतेला स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यास प्रवृत्त केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com