
नागपूर : शासनाचे काही अधिकारी रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्याकडे येतात आणि जमिनीवर रक्त चंदनाचा शंभर वर्षे जुना वृक्ष देखील असल्याची नोंद करतात.. शेतकऱ्याला जमिनीचा मोबदलाही मंजूर केला जातो.. परंतु, रक्त चंदनाच्या वृक्षाच्या मोबदल्याचे काय? असे विचारत शेतकरी न्यायालयात धाव घेतो अन् वृक्षासाठी एक कोटीपैकी ५० लाख रुपयांची रक्कम प्राप्त करतो. आता हाच वृक्ष रक्त चंदनाचा नसून औषधी बिजासालाचा असल्याचा खुलासा झाल्याने ते ५० लाख परत करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.