
नागपूर: कधी स्वार्थासाठी, कधी नाईलाजास्तव खऱ्या चेहऱ्यावर मुखवटे लावून जगात वावरणारी माणसे सर्वत्र दिसतात. ते मुखवटे खोटे असतात. कालांतराने गळूनही पडतात. मात्र तेलंगणामध्ये शतकानुशतकांपासून मुखवटे घडविले जातात. ते मुखवटे कलात्मक आणि खरेही असतात आणि ते घडवणारे कलावंतही कलेचे सच्चे साधक असतात.