
माझ्या घरापुढे हनुमान चालिस पठण करा; बावनकुळेंचे शिवसैनिकांना आमंत्रण
नागपूर : राज्यात हनुमान चालिसा पठणावरून वादळ उठलं असतानाच भाजपचे प्रदेशमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिवसैनिकांना त्यांच्या घरापुढे येण्याचे आमंत्रण दिले. शिवसैनिकांनी माझ्या घरापुढे हनुमान चालिसा पठण करावे, त्यांच्यासाठी पेंडॉलसह लाडूच्या प्रसादाचीही सोय करणार, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. माझ्याच नव्हे भाजप नेत्याच्या घरासमोर जरी हनुमान चालिस पठण करण्यास शिवसैनिक आले तर त्यांची उत्तम व्यवस्था केली जाईल. त्यांना जेवण, प्रसाद आणि पूजेचीही व्यवस्था केली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. हनुमान चालिस पठणावरून राज्य सरकार इंग्रजासारखे वागत असल्याची टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने विकास केला नाही. यापासून लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात अराजकता निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या घटना घडत आहे, असे ते म्हणाले.
जानेवारीपासून वीज दरवाढ
राज्यात दीड हजार मेगावॅटच्यावर अघोषित भारनियमन होत आहे. शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीज मिळत आहे. परवापर्यंत अडीच हजार मेगा वॅट भारनियमय होत होते. केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटपेक्षा जास्त वीज दिली, कोळसा दिला. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नियोजन केले नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला. राज्यात वीज दरवाढ केली. जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. अनामत रक्कम घेतली जात आहे. वीज बाहेर घेऊन त्यात भ्रष्टाचार करणे हा सुद्धा उद्देश असू शकतो, अशी शंका बावनकुळे यांनी व्यक्त केली.
Web Title: Front My House Recite Hanuman Chalis Invitation Shiv Sainiks Chandrasekhar Bavankule Provide Laddu Prasada Pendulum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..