
गडचिरोली: गडचिरोलीत भीषण अपघात झाला असून यात ६ जणांना चिरडल्याची घटना घडलीय. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली इथं हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेली ६ मुलं रस्त्यावर व्यायाम करत होती. या अपघातामुळे काटली गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात आलंय.