Gadchiroli Crime : अर्चना आणि गडचिरोलीच्या साथीदारांची होणार एसीबी चौकशी ? ;तक्रारीचा अर्ज महासंचालकाकडे वर्ग

सासऱ्याच्या खुनाची सुपारी देत, त्याला कारखाली चिरडून मारण्याचा कट रचणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार आणि गडचिरोलीमधील साथीदारांची एसीबी चौकशी करण्याची तक्रार गडचिरोलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) आली.
Gadchiroli Crime
Gadchiroli Crimesakal
Updated on

नागपूर : सासऱ्याच्या खुनाची सुपारी देत, त्याला कारखाली चिरडून मारण्याचा कट रचणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार आणि गडचिरोलीमधील साथीदारांची एसीबी चौकशी करण्याची तक्रार गडचिरोलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) आली. ही तक्रार महासंचालकांकडे वर्ग केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच तिच्यासह गडचिरोलीतील दोन साथीदारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अर्चना आणि सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यात संपत्तीच्या वाटणीवरून वाद होते. त्यांच्यासोबत राहणारी अर्चनाची वहिणी योगिता पार्लेवार यांनी वडील पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२) यांच्या मदतीने न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामुळे अर्चना व तिचा भाऊ सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक (एमएसएमई) प्रशांत पार्लेवार दुखावले होते. प्रशांतला त्यांच्या उंटखान्यातील जागेवर मॉल बांधायचा होता. मात्र, खटल्याने त्याचे स्वप्न भंगले होते.

त्यामुळे दोघांनी पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट रचला. या कटात गडचिरोलीतील त्यांचे दोन साथीदारही असल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार या कटात अर्चनाची स्वीय सहाय्यक पायल नागेश्वर, अर्चनाचा विश्वासू सार्थक साहेबराव बागडे (वय २९ रा. चैतन्यश्वरनगर, वाठोडा), नीरज ईश्वर निमजे (वय ३०, रा. शक्तीमातानगर, खरबी रोड), सचिन मोहन धार्मिक (वय २९ रा. बगडगंज) व संकेत यांना सहभागी करीत, २२ मे रोजी सकाळी कारखाली चिरडून पुरुषोत्तम यांची हत्या करण्यात आली.

तपासात सातही जणांची नावे समोर आल्यावर त्यांना अटक करीत चौकशीही करण्यात आली. सध्या सर्वजण कारागृहात आहेत. गुन्हे शाखेद्वारे करण्यात आलेल्या तपासादरम्यान अर्चनाने गडचिरोली नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक म्हणून काम करताना मोठी संपत्ती जमविल्याची बाब समोर आली. यात गडचिरोलीतील दोन भूमाफियांची साथ महत्त्वाची असल्याचेही समोर आले.

त्यामुळे पोलिसांनी एसीबीकडे संपत्तीच्या चौकशीसाठी पत्र पाठविण्याची तयारी सुरू केली. हे करीत असतानाच गडचिरोली एसीबीकडे अर्चना व तिच्या दोन विश्वासूंच्या संपत्तीची व अनियमिततेची चौकशी करावी, अशी तक्रार आली आहे. ती महासंचालक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती एसीबीच्या अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gadchiroli
Forest Horror in Gadchiroli: 17-Year-Old Killed, Accused Tried to Mislead Police
Gadchiroli News
Gadchiroli News
Marathi News Esakal
www.esakal.com