

Gadchiroli Civic Polls: Congress Edges Past Rival by Single Vote
esakal
गडचिरोली : निवडणुकीचे गणित एका मतानेही घडू किंवा बिघडू शकते, हे काँग्रेसचे श्रीकांत देशमुख यांनी केवळ १ मत जास्तीचे घेऊन विजय मिळवत सिद्ध केले. श्रीकांत देशमुख यांनी गडचिरोली नगर परीषदेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७१७ मते मिळवून भाजपच्या संजय मांडवगडे यांच्यावर एका मताने विजय मिळवला आहे.