

Shripad Joshi Gets Reply from Gadkari; Denies Any Role in Sahitya Sangh Polls
Sakal
नागपूर: विदर्भ साहित्य संघाची २० वर्षांनंतर होऊ घातलेली निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला निवडणूक लढविण्यास सांगितले, असे वक्तव्य केल्याचा संदर्भ देत श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नितीन गडकरींना जाहीर पत्र लिहिले होते. गडकरी यांनी त्या पत्राला उत्तर देत माझा वि. सा. संघाच्या निवडणुकीत हस्तक्षेप नसल्याचा खुलासा केला आहे.