Garage Fire
sakal
नागपूर - नोकरीतून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या गॅरेजला आग लावल्याचा संशय असलेली घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनीतील बाबा दीपनगर येथे शुक्रवारी (ता. २) पहाटे घडली. या आगीत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सुमारे २० दुचाकी जळून खाक झाल्या. गॅरेजचे सुमारे पाच लाख रुपये, तर आगीच्या झळांमुळे शेजारील क्लिनिकचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.