esakal | ‘मम्मी-पप्पा, सॉरी मी आत्महत्या करतेय’ अल्पवयीन मुलीने लावला गळफास | Commits Suicide
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

‘मम्मी-पप्पा, सॉरी मी आत्महत्या करतेय’ मुलीने लावला गळफास

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ‘मम्मी-पप्पा, सॉरी मी आत्महत्या करतेय...’ अशी सुसाईड नोट लिहून आजाराला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली. जुही राजेश गिरी (वय १६, रा. फ्रेंड्सकॉलनी) असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जुही ही दहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील पॅथॉलॉजीमध्ये नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. तिला लहान भाऊ असून, जुहीला कर्करोग झाला होता. त्यामुळे ती नेहमी तणावात राहत होती. बुधवारी सायंकाळी आई आणि लहान भाऊ देवी दर्शनासाठी मंदिरात गेले होते. तर वडील नोकरीवरून घरी येत होते.

हेही वाचा: कडधान्य निवडताना घ्या काळजी; वाचा यामागचे कारण

घरी कुणीही नसल्याची संधी साधून जुहीने घरात छताच्या हुकला गळफास लावून आत्महत्या केली. आई मंदिरातून घरी परतली असता जुहीला आवाज दिला. परंतु, जुही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे दरवाजा उघडला असता तर मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आईने मोठ्याने हंबरडा फोडला तेवढ्यात वडील घरी पोहोचले. त्यांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ‘मम्मी-पप्पा, आय ॲम सॉरी... मी आजाराला कंटाळून आत्महत्या करतेय... माझ्या लाडक्या भावावर माझे खूप प्रेम आहे... तू मोठा हो आणि आई-वडिलांचा सांभाळ कर...’ असे सुसाईड नोटमध्ये उल्लेख जुहीने केला होता.

loading image
go to top