esakal | वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, बालमित्रांना पाहून आईने फोडला टाहो
sakal

बोलून बातमी शोधा

arushi

वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

sakal_logo
By
- अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : लहान मुलांचा वाढदिवस म्हणजे घरात आनंदाचे वातावरण असते. मंगळवारी आरुषी राऊतचा वाढदिवस होता. अकराव्या वर्षात तिचे पदापर्ण होणार होते. मात्र, त्यापूर्वीच नियतीने डाव साधला. वाढदिवस साजरा करण्याची संधी हिरावली. तिच्या बालमित्रांना पाहून आई पुष्पाचा शोक अनावर झाला. (girl died before one day of her birthday in hingana of nagpur)

हिंगणा तालुक्यातील आमगाव देवळी नाल्यात मासोळ्या पकडण्यासाठी गेलेले आरुषी(१०)व अभिषेक विलास राऊत यांचा पाण्यात बुडून १४ जून रोजी मृत्यू झाला होता. विलास राऊत, पत्नी पुष्पा शेतमजुरी करून कुटुंबांचा गाडा हाकत होते. दोन मुलांमुळे संसारात गोडी वाढली होती. १४ जून हा दिवस या कुटुंबासाठी भयावह ठरला. दोन्ही मुले घरून बेपत्ता झाली. यानंतर गावाजवळील नाल्यात बुडून करूण अंत झाला. या धक्यातून कुटुंब अजूनही सावरले नाही.

आरुषीचा १५ जूनला वाढदिवस होता. तिची आठवण आजी लिलाबाईंना सतावत आहे. वडील विलास व पत्नी पुष्पा घराच्या दारावर निराश होऊन बसले होते. वाढदिवस होता, तिनेच जगाचा निरोप घेतला होता. तिचे बालमित्र गावात दिसले, की त्यांना पाहून आईने हंबरडा फोडला. दरवर्षी कुटुंबीय तिचा वाढदिवस छोटेखानी पद्धतीने साजरा करीत होते. लहान मुलांना बोलावून चिवडा, चॉकलेट व लहानसा केक कापून साजरा करीत होते. यंदा मात्र वाढदिवसावर विरजण पडले. घरात शांत वातावरण होते. आरुषी नसल्याने बालमित्रही घराकडे फिरकले नाहीत. लहान मुलं देवाघरची फुलं, असं म्हटले जाते. मात्र, दोन्ही पोटचे गोळे हिरावल्याने त्यांच्या घरात स्मशान शांतता पसरली आहे. शेवटी नियतीपुढे कोणाचंही चालत नाही.

loading image