esakal | दारू पाजून मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

physical abused

दारू पाजून मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बारावीच्या विद्यार्थिनीला वाकी येथील फॉर्महाऊसवर नेऊन दारू पाजल्यानंतर तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार (girl physical abused nagpur) केला. बलात्कार करताना मोबाईलने मुलीचे व्हिडिओ आणि फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. ही धक्कादायक घटना मानकापुरात (mankapur nagpur) उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल (nagpur crime) करून तिनही नराधमांना अटक केली.

हेही वाचा: शिवसेना संपर्क प्रमुखांचे पंख छाटले; घ्यावी लागणार चौघांची संमती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय रिया (बदललेले नाव) मुलगी मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील आजारी असतात तर आई मजुरी करते. तिला लहान बहिण असून ती दहावीत शिकते. रिया बारावीची विद्यार्थिनी आहे. आरोपी मंगेश नामदेव हुडके (३५, काळे लेआउट, श्रीकृष्णनगर) याची ती दूरची नातेवाईक आहे. त्यामुळे रियाच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. मंगेश हा खासगी वाहनावर ड्रायव्हर आहे. त्याने तिच्याशी सलगी वाढवली. ११ मार्च २०२० मध्ये तो रियाच्या घरी आला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. त्या संधीचा फायदा घेऊन त्याने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो घरी कुणी नसताना तिच्या घरी वारंवार यायला लागला. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.

फार्महाऊसवर पाजली दारू -

आरोपी मंगेश हुडके हा रियाच्या घरी आला. मंगेशने तिला कारमध्ये बसवले आणि थेट वाकी येथील एका फार्महाऊसवर नेले. रात्री नऊच्या सुमारास तेथे आरोपी आकाश राजेश खोटे (२९, दुर्गानगर) आणि आरोपी ब्रिजलालसिंह ठाकूर (४५, चंद्रिकापुरे लेआउट) हे दोघे आले. तिघांनी दारू ढोसली. त्यानंतर रियालाही बळजबरी दारू पाजली. त्यानंतर तिघांनीही रात्रभर तिच्यावर अत्याचार केला.

व्हिडिओ व्हायरलची धमकी

फार्महाऊसवर बलात्कार करताना मोबाईलने व्हिडिओ काढले. त्यानंतर तिचे नग्न फोटोही काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मंगेश हुडके, ब्रिजलालसिंह ठाकूर आणि आकाश खोटे हे तिघेही वारंवार शारीरिक संबंधासाठी बळजबरी करीत होते. केव्हाही घरातून उचलून नेणे आणि पहाटेच्या सुमारास घरी सोडणे असा प्रकार मंगेश करीत होता. त्यामुळे रिया या प्रकाराला कंटाळली होती.

असा झाला उलगडा -

अत्याचार सहन न झाल्यामुळे राखीच्या दिवशी वडिलांना सांगितले. यातून कसा मार्ग काढावा, याबाबत चर्चा केली. गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचाराला मुलगी बळी ठरत असल्यामुळे तिने पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिच्या वडिलांनी महिला सामाजिक कार्यकर्त्यांना मदत मागितली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिनही आरोपींना अटक केली.

loading image
go to top