esakal | दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; अल्पवयीन प्रियकरावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; पालक पडले संभ्रमात

दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; पालक पडले संभ्रमात

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने पोट दुखत असल्याची आईकडे तक्रार केली. मुलीला घेऊन आई डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांवर संशय घेत पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी समजूत घालून समुपदेशन केल्याने मुलीने कबुली दिली. त्यामुळे आईने मुलीसह पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला. (girl pregnant-Nagpur-News-Crime-News-police-file-case-against-boyfriend-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही एमआयडीसी परिसरात राहते. ती अकराव्या वर्गात शिकते. तिचे वडील कंपनीत नोकरीला आहे तर घरी किराणा दुकान आहे. दहावीत असताना तिचे शेजारी राहणारा मुलगा सुशांत याच्यासोबत ओळख झाली. तो नेहमी रियाच्या किराणा दुकानात येत होता. दहावीत असलेल्या रियाला तो मार्गदर्शन करीत होता. दोघांची मैत्री वाढली. त्यानंतर किराणा दुकानात आई नसताना दोघांच्या चोरून भेटी वाढल्या.

हेही वाचा: केवळ बैठकांसाठी नानांचा वापर; नौटंकीवरून बावनकुळेंनी घेतला समाचार

वर्षभरात दोघांचेही प्रेम बहरले. दोघेही एकमेकांच्या सानिध्यात राहायला लागले. ४ ऑक्टोबर २०२०ला घरी कुणी नसताना दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून दोघेही वारंवार संधीचा फायदा घेऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करीत होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा वस्तीत व्हायला लागली.

मार्च महिन्यात रियाला सुशांतने सीआरपीएफ कंपाउंडमध्ये फिरायला नेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने आईकडे पोट दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी रिया चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. सायंकाळी घरी कुटुंबीयांनी चर्चा केली. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Woman Power : विदर्भात एका विभागीय आयुक्तासह पाच महिला जिल्हाधिकारी

पालक पडले संभ्रमात

रिया केवळ १६ वर्षांची आहे तर सुशांत १७ वर्षांचा आहे. अल्पवयीन असल्यामुळे दोघांच्या लग्नाचाही विचार करता येणार नाही. तर दोन्ही मुलांचे आयुष्यही बरबाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. चार महिन्यांची गर्भवती असल्यामुळे आता गर्भपातही करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रिया आणि सुशांत या दोघांचेही पालक संभ्रमात पडले आहेत.

(girl pregnant-Nagpur-News-Crime-News-police-file-case-against-boyfriend-nad86)

loading image