esakal | दोन वर्षांपासून होते प्रेमसंबंध, तिने लग्नाचा तगादा लावला आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

The girl was tortured by showing the lure of marriage

सूरज आणि सुशीला (बदललेले नाव) दोघेही खापरखेडा येथेच रहायचे. त्यामुळे त्यांची दररोज भेट व्हायची. प्रेमाच्या आणाभाका व्हायच्या. दररोजच्या भेटीतून त्यांच्यातील प्रेम फूलत गेले. आपण लवकरच लग्न करू असे आश्‍वासन तो सुशीलाला प्रत्येक भेटीत द्यायचा.

दोन वर्षांपासून होते प्रेमसंबंध, तिने लग्नाचा तगादा लावला आणि...

sakal_logo
By
दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : दोघेही एकाच गावचे असल्याने त्यांची अधूनमधून भेट व्हायची. नजरेवर नजर पडल्यावर ती गालातल्या गालात हसायची. तिचे ते स्मित हास्य बघून मग तोही तिच्यात गुंतत गेला. अधूनमधून होणारी भेट मग रोज घडायला लागली. तासन्‌तास प्रेमाच्या गोष्टी रंगायच्या. प्रेमात आकंठ बुडालेल्या तिने आपले सर्वस्व त्याला अर्पण केले. मग मात्र तो टाळाटाळ करायचा. 

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज आणि सुशीला (बदललेले नाव) दोघेही खापरखेडा येथेच रहायचे. त्यामुळे त्यांची दररोज भेट व्हायची. प्रेमाच्या आणाभाका व्हायच्या. दररोजच्या भेटीतून त्यांच्यातील प्रेम फूलत गेले. आपण लवकरच लग्न करू असे आश्‍वासन तो सुशीलाला प्रत्येक भेटीत द्यायचा. मग तीसुद्धा त्याच्यावर विश्‍वास ठेवून प्रेमात आकंठ बुडाली. आपले सर्वस्व अर्पण करण्याची चूकही तिच्या हातून घडली. मग अनेकदा दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायचे. 

ठळक बातमी - आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...
 

हा प्रकार अनेक महिने चालला. प्रत्येक भेटीत सुशीला त्याला आपण लग्न करणार कधी, हा प्रश्‍न करायची. सूरज प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळायचा. परंतु दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याने सारेच मला विचारतात, या तिच्या प्रश्‍नावर तो स्तब्ध व्हायचा. सूरजच्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी भेटायचे ठरवले होते. आज आपण त्याला लग्नाचे पक्‍के विचारायचेच या इराद्याने ती घरून बाहेर पडली. वाढदिवसानंतर दोघेही एका निर्जन स्थळी भेटले. सुशीलाने लग्नाचा विषय काढताच सूरज टाळाटाळ करू लागला. अखेर तिने आज पक्‍के काय ते सांग, लग्न करण्याचा आग्रह धरल्यावर तो स्तब्ध झाला. सततच नकार ऐकत असलेल्या सुशीलाने थेट खापरखेडा पोलिस ठाणे गाठले. 

चिचोली परिसरात आरोपीने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, सूरज संजय वाघमारे (वय 24, झोपडपट्टी परिसर चिचोली) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. घटनेतील आरोपी व पीडितेचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही ही एकमेकांच्या संपर्कात नेहमी राहत होते. आरोपीने अनेकदा पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

सोमवारी आरोपीच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त पीडिता ही एका निर्जनस्थळी आरोपीकडे गेली असल्याची चर्चा असून, त्यावेळी पीडितेने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला. आरोपीकडून नकार होत असल्याने तिने खापरखेडा पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. खापरखेडा पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली. खापरखेडा पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
संपादन : अतुल मांगे 

loading image
go to top