

Jupiter’s Rare Appearance on January 9 Brings Excitement to Nagpur
Sakal
नागपूर: देवांचा गुरू व ऋग्वेदातील देवता मानला जाणारा बृहस्पती हा ग्रह येत्या नऊ जानेवारीला सायंकाळी अवकाशात भ्रमण करताना पृथ्वीच्या खूप जवळ येणार आहे. त्यामुळे त्याचे नागपूरकरांनाही प्रत्यक्ष दर्शन होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. अवकाशामधील या अनोखे व दुर्मीळ दृश्याचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.