Nagpur Gold Scam : सोने स्वस्तात मिळवून देतो म्हणत ९.१० लाखांची फसवणूक!
9.10 Lakh Gold Cheating in Nagpur : कमी दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत पापुल खान याने नागपूरच्या सराफा व्यापाऱ्याची ९.१० लाखांची फसवणूक केली. फसवणूक झाल्यानंतर आरोपी टाळाटाळ करत असल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर : कमी दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवित दागिने घडविणाऱ्या कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याची ९ लाख १० हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.