Gondia Crime : धारदार शस्त्राने गळा चिरून 20 वर्षीय युवतीची हत्या; कुटुंबीयांनी स्थळ बघितलं होतं, आचलला बघायला पाहुणेही येणार होते, पण...
Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यात बोंडराणी गावात २० वर्षीय आचल कोबळे हिची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक विरोधामुळे ही घटना घडल्याची चर्चा आहे.
गोंदिया : धारदार शस्त्राने गळा चिरून एका २० वर्षीय युवतीची हत्या (Gondia Crime News) करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. ९) सकाळी बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात उघडकीस आली. आचल प्रकाश कोबळे (रा. बोंडराणी) असे मृताचे नाव आहे.