

Nagpur News
esakal
नागपूर: उन्हाचा पारा वेगाने चढू लागल्याने केवळ नागरिकच नव्हे, तर जंगलाचा राजाही घामाघूम झाला आहे. उपराजधानीचे तापमान ४२ अंशांच्या वर पोहोचल्याने गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आणि बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना उन्हाचा तडाखा बसू नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.