Ladki Bahin Yojana : नोकरदार लाडक्या बहिणींना बावनकुळे यांनी ठणकावले; लाभ घेणाऱ्यांवर नक्कीच कारवाई होणार
Chandrashekhar Bawankule : सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्यास आता शासन वसुली करत आहे. ही योजना गोरगरीब बेरोजगार महिलांसाठी होती, असा महसूलमंत्री बावनकुळे यांचा स्पष्ट इशारा.
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यात आला. महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर या योजनेची शहानिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला.