esakal | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपूरच्या दौऱ्यावर; शिष्टमंडळाच्या घेणार भेटीगाठी
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर शहराच्यावतीने महापौर दयाशंकर तिवारी फुल देऊन स्वागत करताना

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपूरच्या दौऱ्यावर; शिष्टमंडळाच्या घेणार भेटीगाठी

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) ११ ते १४ जूनपर्यंत नागपूर दौऱ्यावर (Nagpur tour from 11th to 14th June) आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. शहराचे महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी त्यांचे स्वागत केले. (Governor-Bhagat-Singh-Koshyari-on-avisit-to-Nagpur)

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून, विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

शनिवारी सायंकाळी पाच वाजता ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता एका वृत्तपत्रातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी सव्वा अकरा वाजता अंबाझरी रोड वरील ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते पुन्हा सहभागी होणार आहे. १४ जूनला ते परत मुंबई येथे रवाना होतील.

(Governor-Bhagat-Singh-Koshyari-on-avisit-to-Nagpur)