Green Day Campaign : उपराजधानी आज पांघरणार हिरवा शालू

नागपूर शहरात ‘सकाळ’ स्वास्थ्यम’च्या माध्यमातून ‘ग्रीन डे’ वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी या मोहिमेचा प्रारंभ शहरभर करण्यात येणार आहे.
Green Day Campaign
Green Day CampaignSakal

नागपूर - शहरात ‘सकाळ’ स्वास्थ्यम’च्या माध्यमातून ‘ग्रीन डे’ वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी या मोहिमेचा प्रारंभ शहरभर करण्यात येणार आहे. विविध शैक्षणिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने आयोजित ग्रीन डे उपक्रमातून शहराला हिरवा शालू पांघरण्याचा संकल्प ‘सकाळ’ने केला आहे.

यानिमित्त ‘सकाळ स्वास्थ्यम’, नागपूर वन विभाग (प्रादेशिक) आणि सामजिक वनीकरण विभागातर्फे शुक्रवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर, सेमिनरी हिल्स, टीव्ही टॉवर रोड येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, विभागीय वनाधिकारी संदीप क्षीरसागर, विभागीय वनाधिकारी रामेश्वरी भोंगाडे, सहाय्यक वन संरक्षक विजय गंगावणे, सामाजिक वनीकरणचे वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कैलुके, वन परीक्षेत्र अधिकारी सारिका आदमने, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, सरव्यवस्थापक बेंजामिन रॉक, सहाय्यक सरव्यवस्थापक (जाहिरात) सुधीर तापस, मुख्य व्यवस्थापक (वितरण) विजय वरफडे, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते उपस्थित राहणार आहेत.

ही वृक्ष लागवड वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनात होईल. वाढते तापमान कमी करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन ‘सकाळ’द्वारे यंदाही ‘ग्रीन डे’वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे.

विविध भागातील शाळांमध्ये ‘ग्रीन डे’ उपक्रमाचे आयोजन

लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल बेझनबाग, प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर, सत्यसाई कॉन्व्हेंट अंबिकानगर नरसाळा रोड, सी.जी. वंजारी पब्लिक स्कूल शिवाजी कॉलनी हुडकेश्‍वर, सेंट व्हिन्सेंट स्कूल मानेवाडा रिंग रोड, डिव्हाईन किड्स स्कूल झिंगाबाई टाकळी, हडस सीबीएसई स्कूल सीताबर्डी, ग्रीन सिटी कॉन्व्हेंट सौभाग्यनगर हुडकेश्‍वर रोड, श्रीमती जाईबाई हिंदी इंग्लिश स्कूल समतानगर, महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल वानाडोंगरी, हिंगणा रोड, आर्या कॉन्व्हेंट सर्वश्रीनगर दिघोरी, सत्यसाई विद्यामंदिर स्कूल अंबिकानगर नरसाळा, विश्‍वास माध्यमिक स्कूल श्रीकृष्णनगर, अंश किड्स स्कूल पिपळा, विवेकानंद पब्लिक स्कूल बहादुरा आदी शाळांमध्ये ‘सकाळ ’च्यावतीने ग्रीन डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेंट जोसेफ विद्यालयात कार्यक्रम

सेंट जोसेफ विद्यालय जयताळा नागपूर येथे उद्या शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या ग्रीन डे कार्यक्रमाला शाळेचे संचालक रे. फादर डोमनिक, मुख्याध्यापिका सिस्टर रेजिना धाकी, माजी विद्यार्थी असलेले माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, हरित सेनेचे समन्वयक शिक्षक किशोर बिपटे, लीपिक विद्याधर हाडके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक कान्हेकर, रामटेके, प्रीती आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय विभागीय वनाधिकारी रामेश्वरी भोंगाडे, प्रकाश तडस वनसंरक्षक सामाजिक वनिकरण, सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश तडस, वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप व्ही. कैलुके, वनपाल नीशा अ. देशमुख, वनपाल श्रीमती ए.एन. वैद्य, वनसंरक्षक अश्‍विनी गजभिये, वनमजूर तुलाराम नेवारे, सुनील काळे आदींची उपस्थिती राहणार आहे.

संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन

कुठलीही चळवळ ही अनेक मानवी हातांनी पुढे जात बळकट होते. त्यामुळे वृक्षारोपण चळवळ बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकासह शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ‘सकाळ’द्वारे ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

सत्संग फाउंडेशनद्वारे ‘माझे झाड’ अभियान

नागपूर - सत्संग फाउंडेशन नागपूर केंद्र आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे झाड’ अभियान राबविले जात आहे. यांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता पालिकेच्या बाजीप्रभूनगर उद्यानात होणार आहे. आध्यात्मिक गुरू श्री. एम. यांच्या हस्ते केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि मनपा आयुक्तच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com