

Young Man Killed, Body Buried in Jungle; Accused Ends Life
Sakal
भिसी : भिसी येथील बादल ज्ञानेश्वर मेश्राम (वय २२) हा सर्व्हिसिंगला टाकलेली दुचाकी आणण्यासाठी उमरेड येथे गेला असता बेपत्ता झाला होता. त्याचा जंगलात नेऊन खून केल्याचे व नंतर त्याचा मृतदेह नाल्यात खड्डा खोदून पुरल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या प्रकरणातील एका संशयिताने आत्महत्या केल्याने प्रकरणाचे गूढ आणखीन वाढले आहे.