Nagpur Crime : पैशाच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून; सरपंचासह मुख्य आरोपी अटकेत; पिपळा (डाक बंगला) येथील थरारक घटना
Crime News : पिपळा (डांब) येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांची मध्यरात्री धारदार चाकूने हत्या करण्यात आली. राजकीय, आर्थिक व व्यावसायिक वैमनस्यातून हा थरारक प्रकार घडला.
खापरखेडा : पिपळा (डांब) येथील ग्रामपंचायत सदस्याची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास पिपळा (डाक बंगला) येथील वलनी टी पॉइंटजवळ ही थरारक घटना घडली.