नागपूर : ‘उमेद’ पुरविणार ग्रामपंचायतींना अत्यल्प दरात पुरवणार ‘तिरंगा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Tiranga Activity

नागपूर : ‘उमेद’ पुरविणार ग्रामपंचायतींना अत्यल्प दरात पुरवणार ‘तिरंगा’

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी उमेद अभियानाचे बचत गट अल्पदरात ग्रामपंचायतींना ध्वज उपलब्ध करून देणार आहेत.

त्यानुषंगाने जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत कार्यरत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्थापित स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अत्यल्प दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणारा हर घर तिरंगा या उपक्रमात घरोघरी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. त्यासाठी उमेद अभियानाच्या महिला बचत समूहांकडून ग्रामीण भागात तिरंगा ध्वज जिल्हातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अत्यल्प दरात गावातील नागरिकांना घेता येतील. त्यामुळे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकावून या अमृत महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा पंचायत विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Har Ghar Tiranga Activity Umed Provide Tiranga At Low Rate To Gram Panchayats Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..