
नागपूर : कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सोनेगाव पोलिसांनी सोमवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अटक केली. कारागृहात नेत असताना अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले.