
नागपूर: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज एका प्रकरणात जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला आहे.