

अमरावती: राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर वळणावर आली आहे. सत्तेसाठी भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचे राजकारण सुरू केले आहे, त्यामुळे प्रत्येक शहरात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. ते देवाभाऊ नसून आता ‘घेवाभाऊ’ झाले आहेत. ते बावनकुळेंच्या माध्यमातून भ्रष्टाचार करीत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (ता. सात) पत्रकार परिषदेत केली. यासोबतच मुख्यमंत्री ‘क्लीनचीट’ देण्यापुरते मर्यादित झाले असल्याचाही आरोप केला.