

Chandrashekhar Bawankule
sakal
अमरावती: हर्षवर्धन सपकाळ यांचा नगरपालिका निवडणुकीतील परफॉर्मन्स बघता त्यांचे प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. किंबहुना ते काढून घेण्यात येणार आहे. ते पद वाचविण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलत असतात. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे, अशा शब्दात भाजप नेते ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासोबतच सपकाळ जिथे अशाप्रकारचे वक्तव्य करतील त्या जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते त्यांची दखल घेतील, असा इशाराही दिला.