
नागपूर : काँग्रेस नेत्यांचे भाजपमध्ये सुरू असलेले प्रवेश इच्छेने नसून त्यांना भीती दाखवली जात आहे. काहींना लालच दिले जात आहे. भाजप ही नेता खाणारी चेटकीण असल्याचा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केला. काँग्रेसमुक्त भारत म्हणणारा भारतीय जनता पक्ष काँग्रेसयुक्त झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.