esakal | कोरोना विषाणूशी फाईटसाठी आरोग्ययंत्रणा एकदम सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

corona mask

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात उपचार व तपासणीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका, परिचारिका, तंत्रज्ञ त्यासोबतच सर्व वैद्यकीय अधिकारी यांना उपचारासंदर्भात अवगत करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूशी फाईटसाठी आरोग्ययंत्रणा एकदम सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासोबतच संशयित व्यक्तींची तपासणी करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार विभागातील सर्व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपूरसह जिल्हास्तरावर अलगीकरणासाठी 817 तर विलगीकरणासाठी 220 बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.

कोरोना विषाणूसंदर्भात नागपूर विभागात आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनासंदर्भात माहिती देताना डॉ. जयस्वाल म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात उपचार व तपासणीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका, परिचारिका, तंत्रज्ञ त्यासोबतच सर्व वैद्यकीय अधिकारी यांना उपचारासंदर्भात अवगत करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय अशी राहील व्यवस्था
वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनासंदर्भात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्याअंतर्गत 420 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात 100, भंडारा 60, गोंदिया 20, चंद्रपूर 156 तर गडचिरोली 61 अशा विभागात अलगीकरणासाठी एकूण 817 बेड आहेत. त्यासोबतच विलगीकरण, आयसोलेशनसाठी 220 बेड राखीव आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 70 तर मेयोमधील 60 बेडचा समावेश आहे. यासोबतच आवश्‍यकतेनुसार खासगी हॉस्पिटलमध्ये असलेल्या 1 हजार 661 आयसीयू बेडसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा - त्या अठ्ठावीस प्रवाशांची गाडी सुटली आणि मग! वाचा यांची संवेदनशीलता

मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना
कोरोना विषाणूसंदर्भात आरोग्ययंत्रणेला आवश्‍यक असलेले एन-95 मास्क, पर्सनल प्रोटेक्‍शन कीट, ट्रिपललेअर मास्क, सेफ्टी कीट आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जिल्हास्तरावरही ते मागणीनुसार, उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासोबतच आवश्‍यक खबरदारी घेण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक नियंत्रण ठेवत असून त्यांच्या मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्‍यक असलेल्या 88 प्रकारच्या जीवनावश्‍यक औषधी विभागातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.