

Cervical Cancer: कॅन्सर म्हणजे मरणच...त्यावर आता इलाजच नाही...या संकल्पनेपासून आपण आता खूप दूर गेलो आहोत. कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कॅन्सरचे अनेक सपोर्ट ग्रुप तयार झाले आहेत. कॅन्सरग्रस्तांच्या आयुर्मानात वाढ झाली आहे.
पूर्वी पन्नाशीनंतर आढळून येणारा स्तन कॅन्सर आता तिशीतच गाठतो आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर कधीकाळी नंबर वन होता, आता यावरही नियंत्रण मिळवण्यात वैद्यक तज्ज्ञांना यश आले आहे. मात्र, दीर्घकाळपर्यंत गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करीत असाल तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची जोखीम आहे, यामुळे तपासणी करून घेण्याची सवय सक्तीची करावी, असा सल्ला कॅन्सर रोग तज्ज्ञांनी दिला आहे.