
नागपूर : गुरुवारी अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्याला वादळी पावसाने हजेरी लावली. त्यातही वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहराला व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस परिसरला ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळी वाऱ्यांमुळे वीजवाहिनी व इंटरनेट ताराही अनेक ठिकाणी तुटल्यामुळे अकोला, वाशीम जिल्ह्यांमध्ये अनेक शहरांमध्ये वीज व इंटरनेट रात्री उशिरापर्यंत ठप्प झाले होते.