Monsoon Update: नागपुरात विजांचा गडगडाट आणि मुसळधार श्रावणसरी; दोन दिवस पावसाचा जोर कायम
Heavy Rain: नागपूरसह विदर्भात शनिवारी जोरदार श्रावणसरी कोसळल्या. शहरात विजांसह अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती.
नागपूर : शहरात शुक्रवारपाठोपाठ शनिवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी विजांसह अनेक भागांत अर्धा ते पाऊण तास जोरदार श्रावणसरी बरसल्या. विदर्भात पावसाळी वातावरण आणखी दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होणार आहे.