
नागपूर : शहरात जड वाहनांना नो एन्ट्री असताना, केवळ बांधकामाच्या नावावर जड वाहने शहरात सुसाट फिरत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. गेल्या पाच महिन्यात सात हजारापेक्षा अधिक जड वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, त्यानंतरही गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ किमान दोन हजाराने अधिक आहे. शहरातील अपघातांतील मृतांची संख्या कमी झाली असली तरीही जड वाहतूक वाढल्याने अपघाताचा धोका तितकाच वाढल्याचे दिसून येत आहे.