डोक्यावर वार केल्याने हेल्परचा मृत्यू; आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

घराच्या माड्यावर काम करीत असताना, मिस्त्री आणि हेल्पर यांच्यात भांडण झाले.

डोक्यावर वार केल्याने हेल्परचा मृत्यू; आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल

नागपूर - घराच्या माड्यावर काम करीत असताना, मिस्त्री आणि हेल्पर यांच्यात भांडण झाले. त्यामुळे हातात असलेल्या स्लॅप प्लेन करणाऱ्या लाकडी अवजाराने हेल्परच्या डोक्यावर वार करीत त्याचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

तिलक चव्हाण (वय ४०) असे असून आरोपी महादेव जागोजी सोनुने (वय ६३ रा. बाबादिपसिंगनगर गुरुद्वारानगर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळ बेझनबाग परिसरात राहणारे चंदन मेश्राम (वय ६०) यांच्या घरचे स्लॅबचे काम आज सुरू होते. यावेळी त्यासाठी ठिय्यावरुन तिलक चव्हाण हा हेल्पर आणि महादेव सोनुने हे दोघेही कामास आले. स्लॅब टाकून झाल्यावर त्यावर पाणी अडविण्यासाठी कप्पे तयार करीत असताना तिलक आणि महादेव यांच्यात भांडण झाले.

यावेळी त्याचा हातात असलेल्या लाकडी अवजाराने तिलकला डोक्यावर मारले. त्यामुळे तो खाली कोसळला. ही माहिती चंदन मेश्राम यांना मिळताच, त्यांनी तिलकला सुरुवातीला परिसरातील जनता हॉस्पिटल आणि त्यानंतर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तिलक ठिय्यावरुन कामाला आल्याने तो नेमका कुठे राहतो हे उद्या ठिय्यावरील कामगारांना विचारुन माहिती घेण्यात येईल. दरम्यान पोलिसांनी आरोपी महादेव जागोजी सोनुने यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Helper Dies After Being Hit In The Head Accused Arrested Charged Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top