कोरोनाग्रस्तांसाठी ‘हेल्पिंग हैंड्स’; व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीतून चोवीस तास मदत करण्यात आघाडीवर

कोरोनाग्रस्तांसाठी ‘हेल्पिंग हैंड्स’; व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीतून चोवीस तास मदत करण्यात आघाडीवर

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने कोरोनाग्रस्त रुग्ण व कुटुंबीयांसमोर निर्माण झालेल्या अडचणींना सोडवण्यासाठी ‘हेल्पिंग हँड्स’ (Helping hands) या युवकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या (WhatsApp group) मदतीतून चोवीस तास मदत करण्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत मुंबईपासून गडचिरोलीपर्यंतच्या शेकडोंना विविध मदत प्राप्त झाल्याचे गरजवंत सांगतात. टाळेबंदीमध्ये ऑनलाइन सुरू झालेली ही चळवळ आता अनेकांचा आधार झाली आहे. (Helping Hands Leads to help twenty four hours a day with the help of WhatsApp)

आरोग्य सुविधेबाबत राज्यभरात सुरू असलेल्या गोंधळामुळे वेळेवर औषधोपचार, खाटा, प्राणवायू, रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स मिळविण्यासाठी रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. ही परिस्थिती बघून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. प्रणीतकुमार जांभुळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘हेल्पिंग हँड्स’ नावाचे समूह बनवला. यात आरोग्य, सामाजिक संस्था, प्रसार माध्यम, राजकीय या सारख्या विविध क्षेत्रात व्यक्तींना जोडले.

कोरोनाग्रस्तांसाठी ‘हेल्पिंग हैंड्स’; व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीतून चोवीस तास मदत करण्यात आघाडीवर
याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्‍कम परत

यातील सर्व सदस्य राज्यातील विविध शहरातील आहेत. यामुळे कुठल्याही शहरात प्राणवायूची गरज असो वा रुग्णालयातील खाट उपलब्ध करणे असो याबाबतची गरज ग्रुपवर टाकल्यास सर्वच सदस्य होईल ती मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतात. आतापर्यंत शेकडो गरजूंना या माध्यमातून मदत झाली आहे. इतकेच नव्हे तर रुग्णाचा अहवाल बघून त्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाते. यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे ग्रुपचे सदस्य सांगतात.

आईची तब्येत एकदम खालावली होती. वेळेवर तिला अतिदक्षता विभागात हलवण्यास डॉक्टरांनी सांगितले. पण, नागपुरात कोणत्या रुग्णालयात खाट उपलब्ध आहे हे कळत नव्हते. मी या ग्रुपवर माझी गरज सांगितली. आता मला लगेच रिक्त खाट असलेल्या रुग्णालयाचा पत्ता पुरवण्यात आला.
- रूपेश, गडचिरोली
कोरोनाग्रस्तांसाठी ‘हेल्पिंग हैंड्स’; व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीतून चोवीस तास मदत करण्यात आघाडीवर
VIDEO : चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का?
आमच्या ग्रुपमध्ये आरोग्यासह विविध क्षेत्रातील जवळपास २५० युवक जुळलेले आहेत. राज्यातील कोणत्याही शहरात कोविड संदर्भात कुणाला अडचण निर्माण झाल्यास ती कशी पूर्ण करता येईल, यासाठी हे युवक झटत आहेत. प्रयोग म्हणून तयार केलेल्या या ग्रुपमध्ये सर्वच युवक जमेल ती मदत करण्यास तत्पर आहेत.
- डॉ. प्रणीतकुमार जांभुळे, संयोजक, हेल्पिंग हँड्स ग्रुप

(Helping Hands Leads to help twenty four hours a day with the help of WhatsApp)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com