चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eugene shoemaker

VIDEO : चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का?

नागपूर : आतापर्यंत अनेकजण चंद्रावर (moon surface) जाऊन आलेत. चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? याबद्दलही बऱ्याच लोकांना माहिती आहे. आजपर्यंत अनेक स्पेसरॉकेट पाठविण्यात आले. ते यशस्वीपणे पृथ्वीवर परत देखील आलेत. चंद्रावर पाणी (water on moon surface) असल्याचंही बोललं जातंय. पण याच चंद्रावर एका व्यक्तीला दफन (man burried on moon) केलं होतं हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. चंद्रावर दफन करण्यात यावे, अशी एका अमेरिकी शास्त्रज्ञाची (amrican astrogeologist eugene shoemaker) इच्छा होती. त्यामुळे त्याला चंद्रावर दफन करण्यात आले. (astrogeologist eugene shoemaker came to be the only person buried on the moon)

हेही वाचा: वय अवघं 13 वर्षे ! आयुष्मानने बनवली साबणाचे पाणी रिसायकल करणारी मशिन

यूजिन शेमेकर असे या शास्त्रज्ञाचे नाव असून आतापर्यंत पृथ्वीवरून चंद्रावर दफन करण्यासाठी पाठवलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. जानेवारी १९९८ मध्ये नासाच्या लुणार प्रॉस्पेक्टरने त्यांच्या अस्थीचा काही भागा चंद्रावर नेण्यात आला.

शूमेकर त्याची मुख्य शाखा असलेल्या भूगोलशास्त्रासोबत खगोलशास्त्राचे काही प्रयोग जोडून तो प्लानेटरी सायन्सच्या क्षेत्रामध्ये मदत करीत होता. त्याने पृथ्वीवर अनेक उल्का खड्ड्यांचा अभ्यास केला आणि १९६० मध्ये अमेरिकेच्या भूगोलशास्त्रीय सर्व्हेमध्ये खगोलशास्त्रीय रिसर्च प्रोग्रामचे संशोधन केले. शूमेकर अपोलो मिशनच्या अ‌ॅस्ट्रॉनॉटला चंद्राच्या पृष्ठभागावर काय शोधायला पाहिजे याबाबत प्रशिक्षण द्यायचा. आपल्या नवनवीन संशोधनासोबत त्याचे जगणे सुरूच होते. पण, जुलै १९९७ चा काळ होता. त्यावेळी शूमेकर ऑस्ट्रेलियातील उल्काचा शोध घेत होता. मात्र, याचवेळी त्याचं कार अपघातामध्ये निधन झालं. शूमेकरला अंतराळवीर व्हायचं होतं. पण, काही वैद्यकीय कारणांमुळे त्याला अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे शूमेकरच्या जवळची सहकारी कॅरोलिन पॉर्को यांनी ठरवलं की शूमेकरच्या अस्थी चंद्रावर न्यायच्या. सुदैवाने, शूमेकरच्या अस्थी चंद्रावर नेऊन त्याला श्रद्धांजली वाहण्याची क्लपना नासाला देखील आवडली. त्यानंतर त्यांनी लगेच सेलेस्टीस कंपनीला फोन केला. नासाने यापूर्वी कोणाच्याही अस्थी चंद्रावर नेल्या नव्हत्या. तसेच सेलेस्टीस ही कंपनी असे काम करत होती. त्यामुळे नासाने सेलेस्टीसकडे शूमेकरच्या अस्थी चंद्रावर नेण्यासाठी मदत मागितली. सेलेस्टीस कंपनीचे मालक देखील तयार झाले. कारण भविष्यात याकडे एकमेव उदाहरण म्हणून पाहिले जाईल याची त्यांना खात्री होती.

हेही वाचा: कसं झालं Bluetooth चं नामकरण? यामागची रंजक कथा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

तसेच शूमेकरची इच्छा आणि चंद्राबद्दलच्या अभ्यासाबद्दल त्यांना असलेली आस्था, चंद्राच्या अभ्यासात त्यांनी घातलेली भर, त्यासाठी त्यांनी दिलेला बहुमुल्य वेळ या सर्वांची परतफेड करण्यासाठी आपण एवढेच करू शकतो, असं कॅरोलीनचं मत होतं. त्यामुळे तिने त्या अस्थीतील काही भाग जपून ठेवला. अंतराळात या अस्थी पाठवण्यासाठी पॉली कार्बोनेट कॅप्सूल तयार करण्यात आली आणि त्यात त्या अस्थी ठेवल्या गेल्या. १९९८ मध्ये चंद्रावर पाण्याचा शोध घायला गेलेल्या नासाच्या ल्युनार प्रॉस्पेक्टर स्पेसक्राफ्ट मधून या अस्थी चंद्रावर पाठवण्यात आल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या अस्थिनी भरलेली ती कॅप्सूल दफन करण्यात आली.

Web Title: Astrogeologist Eugene Shoemaker Came To Be The Only Person Buried On The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top