Blood Pressure Awareness
Blood Pressure Awarenesssakal

Blood Pressure Awareness: उच्चरक्तदाब असूनही ६३ टक्के रुग्ण अनभिज्ञ

Impact of negligence in managing high BP: उच्च रक्तदाब असूनही ६३ टक्के लोकांना त्याची जाणीवही नसते. ही आरोग्यदायक अनभिज्ञता घातक ठरू शकते.
Published on

How Many People Are Unaware They Have High Blood Pressure: जगभर होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी १३.१ टक्के मृत्यूंचे कारण उच्चरक्तदाब असते. हृदयाचा झटका, किडनीचे विकार तसेच पक्षाघात होण्यासाठी उच्चरक्तदाब ५० टक्के कारणीभूत असतो. या उच्चरक्तदाबावर नियंत्रण मिळवले तर या विकारांपासून स्वतःचे रक्षण करता येणे शक्य होईल. मात्र, भारतातील एकूण रुग्णांपैकी ६३ टक्के रुग्णांना त्यांना उच्चरक्तदाब असल्याची माहितीच नसल्याचे पुढे आले आहे.

उच्चरक्तदाब असणाऱ्यांच्या अवयवांपर्यंत जास्त दाबाने रक्त प्रवाहित होते. उच्चरक्तदाबाने मेंदूला आघात होऊन पक्षाघात आणि रक्तस्रावाची जोखीम असते. अनियंत्रित रक्तदाबाने डोळ्यांना हानी होण्याची भीती आहे. किडनी निकामी होण्याचा धोका आहे. हृदय, रक्तवाहिन्या अशा रक्ताभिसरण प्रक्रियेतील अवयवांचे कार्य बिघडते. याशिवाय उच्चरक्तदाब विकारासोबत मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, वाढलेले युरिक अ‍ॅसिड अशा समस्यांना देखील निमंत्रण मिळते.

देशातील बाधित

- भारतात सुमारे २८.१ टक्के प्रौढ लोकसंख्येला उच्चरक्तदाब

- रक्तदाबावर नियमित औषधोपचार करणारे १७.७ टक्के

- रक्तदाब नियंत्रित असलेल्या व्यक्ती ८.५ टक्के

याकडे लक्ष द्या

- चालल्यावर भोवळ येत असल्यास

- चालल्यावर दम लागत असेल तर

- परिवारात रक्तदाबाचे रुग्ण असल्यास

- तणावयुक्त जीवनशैली असल्यास

- लठ्ठपणा व मधुमेहाचा त्रास असल्यास

- अन्य आजारांची जोखीम

- बॅड कोलेस्ट्रालचा विकार - ३० टक्के

- युरिक ॲसिडवाढ - २५ टक्के

- लठ्ठपणाचा विकार - ३५ टक्के

रक्तदाब विकार जीवनशैलीशी निगडित आहे. ताणतणावमुक्त, संतुलित जीवनशैली स्वीकारणे उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफुड टाळावे. आहारात वरून मीठ घेणे टाळावे. रुग्णांना कुठलीच लक्षणे नसतात. पण, रक्तदाबाचे निदान होते. उच्चरक्तदाब सायलेंट किलर’ आहे. निदान वेळेत झाले तर हृदयविकार, स्ट्रोक टाळता येतात. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.

- डॉ.अमेय बीडकर, इंटर्वेंशनल कार्डियोलॉजिस्ट, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com