court
sakal
अल्पवयीन भावाने केलेल्या अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या १३ वर्षीय पीडितेच्या गर्भपाताला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय. अल्पवयीन मुलीवर तिच्याच १६ वर्षीय भावानं अत्याचार केले होते. यातून मुलगी २६ आठवड्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेत वैद्यकीय गर्भपाताची परवानगी मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झालीय.