Dhananjay Munde Marathi News : धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं झटका दिला आहे. यापूर्वीच्या मंत्रीमंडळाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यामुळं ते गोत्यात आले आहेत. यामध्ये अनेक अधिकारी देखील गुंतले आहेत. त्यामुळं या अधिकाऱ्यांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. त्यामुळं हायकोर्टाच्या सुनावणीकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.